विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे , दत्ता मामाने केली पाठराखण

Dattatraya Bharne-munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया, विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी यावर भाष्य केले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांची सत्यता पडताळल्यानंतर दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले. हा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. इतिहासात असे अनेक दाखले सापडतील, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.

दत्ता मामा म्हणाले, विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र, या प्रकरणाची सतत्या पडतळल्यानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे भरणे यांनी सांगितले.

‘कोणावरही ताबडतोब गुन्हा दाखल करु शकत नाही’

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी पोलिसांनी आपली तक्रार लगेच दाखल करून घेतली नसल्याचा आरोप केला. यावरही दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले. एखाद्याने तुमच्यावर आरोप केले तर पोलीस लगेच गुन्हा दाखल करू शकत नाहीत. त्यापूर्वी सत्यता पडताळावी लागते, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले.

ते बुधवारी सिद्धेश्वर यात्रेच्या अक्षता सोहळ्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER