…. तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही ; कार्यकर्त्यांच्या प्रेमाने धनंजय मुंडे भारावले

बीड :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचा आरोप रेणु शर्मा यांनी मागे घेतला आहे. या प्रकरणातून दिलासा मिळाल्यानंतर काल प्रजासत्ताकदिनी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचं भव्यदिव्य असं स्वागत केलं. तेव्हा धनंजय मुंडे कार्यकर्त्यांचं हे प्रेम पाहून भारावून गेले.

आपल्या कार्यकर्त्यांच्या. चाहत्यांचे प्रेम पाहून धनंजय मुंडेंना आपल्या बावना आवरता आल्या नाहीत. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशा शब्दात मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

धनंजय मुंडे म्हणाले, आजपर्यंत अनेक संकटाला सामोरा गेलो. सामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करुन आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. हे आशीर्वाद म्हणजे एखाद्या भगवंताचा प्रसादच आहे. अशा कठीण काळात आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलात. त्याबद्दल मी शब्दात आभार व्यक्त करु शकत नाही. अंगावरील कातड्याचे जोडे करुन आपल्याला दिले तरी आपल्या उपकाराची परतफेड करता येणार नाही, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली.

तसेच, धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या विकासातही काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही कार्यकर्ते व नागरिकांना दिली.

कार्यकर्त्यांनी मुंडेंच भव्यदिव्य असं स्वागत केलं अगदी आपल्या नेत्याने मोठी लढाई जिंकून यावी असं. शिरुर कासार इथं जेव्हा धनंजय मुंडे दाखल झाले त्यावेळी जेसीबी मशीनमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर एक भला मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालण्यात आला.

ही बातमी पण वाचा : अखेर पंकजांनी मौन सोडले ; धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना मुलांसाठी झाल्या भावूक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER