कृपया व्यक्तिगत भांडणात माझे नाव जोडू नये, हीच विनंती – धंनजय मुंडे

Dhananjay Munde

बीड : बीडच्या परळी शहरात सोमवारी (१७ फेब्रुवारीला) दुपारी प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यापाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काठी आणि रॉडने मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाण करणारा गणेश कराड धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता असून, मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. ” असा इशाराच मुंडे यांनी ट्विटवरून दिला आहे.

“परळीतील व्यापारी मारहाण प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही. २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली असून ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अशा घटनेत आरोपींवर कडक कारवाई करण्याची सूचना मी बीड पोलिसांना केली आहे. व्यक्तिगत भांडणात कृपया माझे नाव जोडण्याचा प्रयन्त करू नये ही विनंती. ” असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.