भाजप-शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा- धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दोघेही पितापुत्र आज शेतक-यांच्या पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शिवसेनेच्या आजच्या आंदोलनावर विरोधकांनी मात्र टीका केली आहे.

भाजप-शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे.  एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात.  मग त्यांच्या यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात. अरे काय लावलंय यांनी?- अशा शब्दांत  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

तसेच कॉंग्रेसकडूनदेखील शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे.शिवसेनेला सत्तेच्या खुर्चीत असताना शेतकऱ्याची आठवण होत नाही; मात्र विधानसभेच्या निवडणुका येताच शेतकऱ्याच्या मुद्द्यांवर त्यांना खडबडून जाग आली आहे, असा टोला कॉंग्रेसनं लगावला आहे. महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवताना यांना लाज कशी वाटत नाही? असा घणाघातही कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचा वाघ स्वाभिमानी नसून अतिशय लाचार आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली आहे.