उतणार नाही मातणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द कधीही खाली पडू देणार नाही : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मूळ गावी नाथरा येथे अनेक कामांचे शुभारंभ केले. यावेळी गावकऱ्यांनी छोटेखानी कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमावेळी बोलताना मुंडेंनी आपल्या भाषणात बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या.

माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करताना तुम्ही दिलेल्या प्रेमाने मला पुढील कामासाठीन नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यामुळे उतणार नाही मातणार नाही तुम्हाला दिलेला शब्द खाली पडू देणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

आपल्याला मिळणारी आमदारकी आणि जिल्हा परिषदेचे पद कसे मिळाले नाही. हे सांगताना मुंडेंनी राजकारणात ध चा प कसा झाला याचा उल्लेख जाहीरपणे भाषणात केला.

जगात कितीही कौतुक झाले सत्कार झाले आशीर्वाद मिळाले तरीही आपल्या मातीत आपला झालेल्या सत्काराची किंमतच करता येत नसल्याचे मुंडे आपल्या भाषणात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER