धनंजय मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Dhananjay Munde

सातारा :- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे (Sexual abuse) आरोप पाहता त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. ते उंडाळे (ता. कराड ) येथे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

या प्रकरणी भाजपच्यावतीने आम्ही राज्यभर उठाव करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, सातारा भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, महेश जाधव उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्यावतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यापुढेही ती लावून धरली जाईल.

ही बातमी पण वाचा : विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे , दत्ता मामाने केली पाठराखण

यात भाजपचे प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील. ज्या व्यक्तीचे विरोधात आरोप होतात त्या व्यक्तीने पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. पण गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री व सरकार याबाबत आत्मपरीक्षण करतील किंवा राजीनामा देतील असे वाटत नाही. तरीही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा तातडीने द्यावा, अशी आमची मागणी राहणार आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER