बलात्काराचा आरोप : धनंजय मुंडे राजीनामा द्या, किरीट सोमय्या यांनी केली मागणी

Kirit Somaiya-Dhanajay Munde

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

सोमय्या म्हणालेत, महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. धनंजय मुंडे स्वत:च कबूल करत आहेत की माझी एक पत्नी, दुसरी बायको आणि आता तिसरी महिला आरोप करते…जोपर्यंत या सगळ्या प्रकरणातून ते मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही.

प्रकरण

धनंजय मुंडे यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी २००३ पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. मात्र त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत.

हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आले आहे. अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये, अशी ही विनंती धनंजय मुंडे यांनी जनतेला व प्रसार माध्यमांना केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER