रक्षाबंधनाच्या दिवशी पंकजाताई आणि प्रितमताईची खूप आठवण येते; धनंजय मुंडेंचे भावुक उद्गार

Dhananjay Munde-Pankaja Munde-Pritam Munde

बीड : रक्षाबंधनाचा दिवस खरं म्हटलं तर भाऊ बहिणीला एका बंधनात बांधणारा दिवस. मात्र या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त भाऊ-बहीण जोडीची चर्चा केली जाते ती म्हणजे आणि पंकजा मुंडे या भावंडांची. पंकजा मुंडे ह्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे हे राज्याचे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या या नेत्यांमध्ये आज रक्षाबंधनाच्या दिवशी एक वेगळीच आपुलकी पाहायला मिळाली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘आजच्या दिवशी मला राजकारणातील माझ्या बहिणीची आठवण आल्याशिवाय निश्चितच राहत नाही’, या शब्दात त्यांनी भावुक उद्गार काढले.

धनंजय मुंडे यांना राखी बांधण्यासाठी आज त्यांच्या तिघी बहिणी त्यांच्या परळी येथील निवास्थानी आल्या होत्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी ‘आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी बांधली ती पंकजाताईनी. आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली आहे’, अशी आठवण सांगितली.

राजकारणामुळे आमच्या नात्यात कटुता निर्माण झाली असली तरी नात्यात गोडसंवाद असावा अशीच माझी कायम भूमिका आहे. ‘निवडणुकीवेळी मला माझ्या पक्षाची भूमिका मांडायची असते, पक्षाचा विचार जनतेला सांगायचा असतो.

तसंच पंकजा ताई यांनाही त्यांच्या पक्षाचा विचार आणि भूमिका जनतेसमोर मांडावी लागते. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र असे असताना एक मर्यादा मी निश्चितच पाळतो, असं धनंजय मुंडे म्हणाले.