गुन्हा दाखल करू नये म्हणून धनंजय मुंडेंचा रेणूवर दबाव; वकिलाचा दावा

dhananjay munde & Tripathi

मुंबई : रेणू शर्माने (Renu Sharma) गुन्हा दाखल करू नये म्हणून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून दबाव टाकला जातो आहे, असा आरोप रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे. तसेच मला अनेक लोकांचे धमक्यांचे फोन येत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे, म्हणून निर्माण झाला असून मला पोलीस संरक्षण देण्यात यावेत, अशी मागणी मी गृहमंत्र्यांकडे केली आहे, असं त्रिपाठी यांनी सांगितले. (ramesh tripathi on rape allegations on dhananjay munde)

रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषद घेऊन रेणू शर्मा यांची बाजू मांडताना त्यांना येत असलेल्या धमक्यांची माहिती दिली. धनंजय मुंडे प्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत. ते पुरावे आम्ही पोलिसांकडे देऊ. या प्रकरणात पोलीस उद्या एफआयआर दाखल करतील अशी आशा आहे. पोलीसांनी एफआयआर दाखल नाही केला तर आम्ही कोर्टात जाऊ, असे त्रिपाठी म्हणालेत. या प्रकरणात मुंडेंकडून दबाव येत असून पोलिसांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

म्हणून बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही

रेणू यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा व्हिडीओ काढण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची तिला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे तिने केस दाखल केली नव्हती. मात्र, आता काही होणार नाही, असे वाटल्यानेच रेणू यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा या दोन वेगवेगळ्या केसेस आहेत. रेणू आणि करुणा या सख्या बहिणी आहेत. एकीशी लग्न झाली म्हणून बहिणीवर बलात्कार करण्याचा अधिकार मिळत नाही, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER