2019 पासून करूणा शर्मा, रेणू शर्मांकडून ब्लॅकमेलींग – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

मुंबई :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात गायिका रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी बलात्काराची तक्रार दाखल (Rape complaint) केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

या प्रकारानंतर काहींनी धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांचे समर्थन केले. तर काहींनी रेणू शर्मा यांची बाजू घेत त्यांना न्याय देण्याची मागणी केली.

ही बातमी पण वाचा:- धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोपः लवकरच सत्य बाहेर येईल – राष्ट्रवादी

या तक्रारीनंतर धनंजय मुंडेंनी आपली बाजू मांडली त्यांनी सांगितले की, हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत फक्त बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी हे सगळं काही होत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांची बाजू मांडली आहे. रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहीण आहेत. तसेच, परस्पर सहमतीच्या संबंधामधून करुणा शर्मायांच्यापासून एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असल्याचेही त्यांनी म्हटलंय. सदर दोन्ही मुलांना मुंडे यांनी त्यांचे नाव दिल्याचे सांगत सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव असल्याचं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलंय.

2019 पासून करूणा शर्मा, रेणू शर्मांकडून ब्लॅकमेलींग

धनंजय मुंडे यांनी पुढे करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्याकडून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा आरोप केलाय. “2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्यासुद्धा देण्यात आल्या,” असं मुंडे यांनी म्हटलंय. तसेच, या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, मुंडे यांच्यावर झालेल्या या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कोणी रेणू शर्मा यांना न्याय देण्याची मागणी करत आहे. तर कणी मुंडे यांच्यावरील आोरोप बिनबुडाचे असून फक्त फसवण्यासाठी हे सगळं केलं जात असल्याचं म्हणत आहेत.

तर, या आरोपानंतर राष्ट्रवादीनेही आपली प्रतिक्रिया देत तपासात सर्व सत्य बाहेर येईल असे म्हणून अधिक बोलणे टाळले.

दरम्यान, रात्री रेणू शर्मा यांनी सलग ट्विट् करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का केलं होत? याचा जाब विचारण्याचा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला आहे. तसेच, पोलीस जेव्हा या गोष्टीचा तपास करतील तेव्हा या सगळं काही समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोपः लवकरच सत्य बाहेर येईल – राष्ट्रवादी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER