राजगृह म्हणजे आमची अस्मिता ; ‘त्या’ माथेफिरूंवर कठोर कारवाई करा : धनंजय मुंडे

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात येत आहे . तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला असून, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी,” असे मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील याप्रकरणी पोलीस तत्परतेने तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER