महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करू – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

औरंगाबाद :- महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करू. भाजप, शिवसेनेच्या यात्रा त्यांनी केलेल्या विकासकामे दाखवण्यसाठी नाही तर आम्हीच सत्तेत येणार आहोत. असे दाखवण्यासाठी होती. पवार साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न या युती सरकाने केला. शेतकऱ्यांची कामे केली नाही. कर्जमाफी कागदावर त्यामुळे धास्ती घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी विकासाचे चित्र रंगवून विरोधात कोणी राहू नये म्हणून इतर पक्षाचे लाेक घेवून विरोध संपवण्याचा प्रयत्न केला. असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडुळ (ता. पैठण) येथे मंगळवारी (दि.१५) महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व राज्यसरकारवर विविध मुद्यांवरून जोरदार टिका केली.

ही बातमी पण वाचा : मोदीच काय डोनाल्ड ट्रम्प जरी आले तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही : धनंजय मुंडे

यावेळी आमदार सतीश चव्हाण, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, माजी मत्री अनिल पटेल, विनोद तांबे, हाजी मुक्तार मौलाना, भाऊसाहेब तरमळे, एकनाथ गवळी, शिवाजी गावंडे, भाऊसाहेब पिसे, शार्दुल गावंडे, राजुभाई विटभट्टीवाले, शेख नासेर, हारूणभाई पठाण, रूस्तुमराव बनकर यंाची उपस्थिती होती.