अखेर धनंजय मुंडेंनी घेतली पवारांची भेट; मोठी घडामोड घडण्याची शक्यता

Dhananjay Munde-sharad pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. बलात्काराचे आरोप आणि विरोधकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे  भेट घेतली.

शरद पवार यांच्या भेटीत धनंजय मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाबाबत होत असलेल्या आरोपांवर स्वत:ची बाजू मांडली. राष्ट्रवादीचे वजनदार नेते असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप झाल्याने पक्षाची प्रतिमाही मलिन होत आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांनी  धनंजय मुंडे यांना आरोप प्रकरणातील पुढील भूमिकेबाबत कुठला सल्ला दिला याबाबतची माहिती पुढे आलेली नाही. धनंजय मुंडे यांची बलात्कार प्रकरणात संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे शरद पवार हे खरंच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची सूचना करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER