धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत; राजकीय मदतीचा प्रश्नच नाही: कृष्णा हेगडे

krishna hegde & dhananjay munde

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्कारचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मुंडे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर मला फारसं भाष्य करायचं नाही. हे केवळ एक प्रकरण नाही. तर हा पॉलिटिक्सचा पहिला मीटू प्रकार आहे, असं हेगडे (Krishna Hegde) म्हणाले.

मुंडे हे माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच नाही, असं भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केलं. रेणू शर्मा प्रकरण हे पॉलिटिक्समधील पहिलं मीटू प्रकरण असल्याचा दावाही हेगडे यांनी केला.

मी धनंजय मुंडेंना ओळखतो. त्यांना 2012मध्ये एकदाच भेटलो होतो. पण ते माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच येत नाही, असंही ते म्हणाले. रेणू शर्मा यांनी हेगडे यांचा आदर करत असल्याचं सांगितलंय. त्याबाबत हेगडे यांना विचारले असता, त्या माझ्या आदर करतात. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण आदर दुरूनच करा. मीही त्यांचे लांबूनच आभार मानतो, असेही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER