मुलीचं पालकत्व स्वीकारत धंनजय मुंडे म्हणाले, ‘बाळ शिवकन्या औक्षवंत हो’

मुंबई :- राज्याच्या सामाजिक न्यायमंत्रीपदाचा पदभार सांभाळणाऱ्या धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून एक मंत्री आणि एक व्यक्ती म्हणून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. रेल्वे रुळाजवळील काटेरी झुडुपांमध्ये एका नवजात बालिकेला टाकून कोणीतरी पळ काढल्याची घटना घडली. याविषयीचीच माहिती जेव्हा धनंजय मुंडे यांना मिळाली, तेव्हा त्यांनी क्षणार्धातच या मुलीचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तसेच तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची सर्व जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे व धनंजय मुंडे यांनी स्वीकारून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी या बाळाचं नाव ‘शिवकन्या’ असं ठेवलं आहे.

‘उद्धव ठाकरें विधानसभेतून पळाले, त्यांच्यापेक्षा कर्मचारी जास्त काम करतात’ – चंद्रकांत पाटील

त्यांच्या या कृतीचं सर्वस्तरातून कौतुक होत असताना, “शिवकन्या सुखरूप असावी म्हणून धडपडणाऱ्या नागरिकांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. बाल संगोपन समिती व वैद्यकीय विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत ते सर्व बाळाची काळजी घेत आहेत. बाळ शिवकन्या औक्षवंत हो!” असं धनंजय मुंडे ट्वटिद्वारे म्हणाले आहेत.

तसेच, “सुप्रियाताई सुळे व मी फक्त आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. मुळात झालेला प्रकार संतापजनक आहे, नुकताच जन्म झालेल्या बाळाला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना कठोर शासन होईल. यापुढे अशा घटना होणार नाहीत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू. #शिवकन्या रुपी लक्ष्मीचा सांभाळ आपण सारे मिळून करू. #बेटीबचाव.” असं देखील आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.