पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी हा तर पळपुटेपणा ; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

Maharashtrta Today

बीड : बीड जिल्हा बँकेची (beed-district-bank-elections) आज आठ जागांसाठीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.

‘पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे .

‘सहकार मंत्र्यांनी यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्यानिर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मात्र मान्य झालं नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचे मतदार यांचं ऐकत नाहीत, अशी स्थिती दिसून येत आहे. तसंच 21 तारखेला निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती थोडीशी अब्रू वाचविण्यासाठी भाजपने पळपुटेपणापणा केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

बीड जिल्हा बँकेच्या 19 पैकी 9 जागांवर निवडणूक होत आहे. निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली असल्याची चर्चा आहे पण तरीही महाविकास आघाडीही निवडणूक अत्यंत ताकतीने लढणार असल्याचे सांगितले. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER