… पण सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

बीड:  राज्यातील ऊस उत्पादकांची परिस्थिती पाहता उसाचे गाळप करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Uddhav Govt) घेतला आहे. तसेच ३४ साखर कारखान्यांची (sugar-factory) थकहमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात परळीच्या कारखान्याचाही समावेश असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. यासोबतच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे .

आम्ही पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो, तरीही सुडाचे राजकारण करणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे . धनंजय मुंडेंनी यावेळी भाजप  नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांनी पाठपुरवठा कधी केला? कसा केला? परदेशातून केला की मंत्री म्हणून कोणी पाठपुरवठा केला हे कोणालाही समजेल, असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता लगावला आहे .

“परळीच्या कारखान्याबाबत माझे वेगळे मत आहे. तो कारखाना उभा करण्यापासून नीट सुरू होईपर्यंत त्यासाठी माझ्या वडिलांचे योगदान आहे. तो कारखाना बंद राहणं मनाला पटत नाही . भलेही त्याचा कारखाना चेअरमन वेगळ्या पक्षाचा आहे तरी राजकारण करणार नाही. ” असे धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान, या थकहमीवरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रयत्नामुळे ही थकहमी मिळाल्याचा दावा केला आहे. तर वैजनाथ साखर कारखान्याला मिळालेली थकहमी ही आपल्या पाठपुराव्यामुळे मिळाली आहे, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER