धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन

Dhananjay Munde

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण (dhananjay-munde-corona-positive) झाली आहे. मुंडे यांनी स्वत: ट्विट  करून ही माहिती दिली आहे. याआधी जून २०२० मध्ये मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्हआली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पुढे कोरोनामुक्त होऊन ते राजकारणात सक्रियही झाले होते.

“माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER