शिवजयंतीवरुन राष्ट्रवादीची मोठी भूमिका, धनंजय मुंडे म्हणाले, आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोललो होतो!

औरंगाबाद : शिवजंयती उत्सवावर (Shiv Jayanti Guidelines 2021) निर्बंध घातल्यामुळे ठाकरे सरकार विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे . त्यातच आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारला घरचा आहेर मिळाला असंच म्हणावा लागेल. “जेव्हा पहिला जी आर काढला तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना बोललो होतो .

त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्री महोदयांना जीआर बदलवायला हवा असे सांगितले होते . निर्बंध घालण्याऐवजी मोकळेपणाने शिवजयंती साजरी करण्यासाठी नियमांचे पालन करुन व्हायला हवी, असे धनंजय मुंडे म्हणाले.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्याबाबत निर्बंध घातले आहेत. मात्र त्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणत्या परिस्थितीत मोठ्या उत्साहात शिवजंयती साजरा करण्याचा निर्धार भाजपने केला आहे.

ठाकरे सरकारने कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER