धनंजय मुंडे प्रकरण : कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, दोषींवर योग्य ती कारवाई करू- गृहमंत्री

Dhananjay Munde - Anil Deshmukh

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराच्या आरोपामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अखेर मौन सोडले आहे. धनंजय मुंडे प्रकरणात दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सर्व समान असतात.

कायद्यापुढे कोणीही मोठा नाही वा कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले.

मात्र, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा (FIR) कधी दाखल करणार, या प्रश्नाचे उत्तर देणे देशमुख यांनी टाळले. चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगत अनिल देशमुख यांनी काढता पाय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER