धनंजय मुंडेंनी शब्द पाळला… सामाजिक तसंच पॉलिटिकल इंजिनिअरिंगचंही घडवलं दर्शन!

Dhananjay Munde

परळी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप व त्यानंतर त्यांच्या राजकीय करिअरवर मोठे आरिष्ट आले होते. असे असले तरी शो मस्ट गो ऑन या उक्तीला अनुसरून धनंजय मुंडेंचे काम सुरूच राहिले. तेदेखील आपला राजकीय धर्म पाळत.

परळी नगर परिषदेच्या सभापती निवडींमध्ये महाविकास आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापतीपद दिले. परळी नगर परिषदेत एकूण 32 निवडून आलेले आणि 3 स्वीकृत असे एकूण 35 नगरसेवक आहेत. यांपैकी जवळपास 30 नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

त्यामुळे बीडच्या राजकारणात हा चर्चेचा विषय ठरत आहे. परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली, या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्व जाती-धर्मांवर न्याय करतच महाविकास आघाडीच्या धर्माचेही पालन केल्याचे दिसून आले.

दरम्यान एकीकडे आपल्यावर झालेल्या आरोपांचा सामना करत असताना धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत एकेरी वर्चस्व मिळवले; त्यापाठोपाठ आता नगर परिषद विषय समित्यांच्या निवडींमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळून व सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका बजावून आपल्यातील सोशल इंजिनिअरिंग सह पॉलिटिकल इंजिनिअरिंगचेही दर्शन घडवले आहे असेच म्हणावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER