राठोडांनंतर धनंजय मुंडे : ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनीच भूमिका घ्यावी, पंकजांचा टोमणा

Pankaja Munde & Dhananjay Munde

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी टोमणा मारला – वैयक्तिक बाबतीत विचार करता ज्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांनीच भूमिका घ्यावी.

या संदर्भात ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीका करताना त्या म्हणालात, सरकार टीकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाते आहे, हे दुर्देवी आहे. संजय राठोड प्रकरणात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. सध्याच्या सरकारने जो पायंडा पाडला आहे तो स्त्रियांसाठी घातक आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या व संजय राठोड यांचा संबंध हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरणाऱ्या भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पंकजा मुंडे यांनी कौतुक केले. संजय राठोड यांच्यावर इतरांनीही आरोप केले होते, मग चित्रा वाघ यांचेच फोटो ‘माॅर्फ’ का करण्यात आले ? या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER