
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची बलात्कारासारख्या गंभीर आरोपातून सुटका झाली. त्यामुळे सध्या तरी मुंडे यांच्यावरील बला टळली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यात आल्यानंतर त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या चित्रकूट बंगल्यावर (Chitrakoot) कार्यकर्त्यांची मोठी रांग लागली आहे. तसंच या बंगल्यात सध्या पुष्पगुच्छांचा खच दिसून येत आहे. आपल्या लाडक्या नेत्याची गंभीर आरोपातून सुटका झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येत आहे.
रेणू शर्मा यांनी आपली तक्रार परत घेतली आहे. त्यामुळे आता चित्रकूट बंगल्यावर आनंदाचं वातावरण आहे. या बंगल्याच्या सभागृहात पुष्पगुच्छांचा खच पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गंभीर आरोपातून सुटका झाल्यानंतर मुंडे यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने अभय दिल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला