कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून धनंजय व पंकजा मुंडे यांच्यात जुंपली

Dhananjay Munde-Pankaja Munde

बीड :- केवळ केंद्र शासनाच्यावर जबाबदारी टाकून भागणार नाही. राज्याचे लसीकरण आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचे ऑडिट याची दररोज मााहिती दिली पाहिजे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीतकमी अवधी या सूत्रानुसार काम करावे लागेल, असा सल्ला भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिला होता. यावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा यांना टोमणा मारला, उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आली आहे. आता त्यांनी केंद्राकडे लशीसाठी विचारणा करावी.

आज महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणानंतर ते माध्यमांशी बोलताना ते म्हणालेत, आपल्या जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष द्यायला पाहिजे होते. पण उशिरा का होईना त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आली, आता उशिरा का जाग आली असं म्हणता येत नाही. त्यांनी ज्या सूचना केल्या त्याची अधिक काळजी घेऊ. मात्र, आपणही केंद्रामध्ये सत्तेत आहात. त्यामुळे बीड जिल्ह्याला अधिक लसी कशा मिळतील यासाठी त्यांना जाग आली पाहिजे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या – १ मे रोजी ‘सेकंड डोस’ उपलब्ध करणे शासनाला क्रमप्राप्त आहे. तो शब्द शासनाने जनतेला दिला आहे, तो पाळलाच पाहिजे. केवळ केंद्र शासनाच्यावर जबाबदारी टाकून जमणार नाही. राज्याचे लसीकरण आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचे ऑडिट याची दररोज मााहिती दिली पाहिजे. जास्तीत जास्त लसीकरण केंद्र कमीतकमी अवधी हे सूत्र लागू करावे लागेल. लसींचे उत्पादन करणे, साठा बनवणे,तापमान नियंत्रित करणे यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत करावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button