मिनी काश्मीर महाबळेश्वरात दवबिंदू गोठले

Dewpoint froze in Mini Kashmir Mahabaleshwar

सातारा : सातार्यातील मिनी कश्मीर (Mini Kashmir) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) कडाक्याची थंडी वाढलेली आहे. महाबळेश्वर परिसरातील वेण्णा लेकमध्ये तापमान पाच अंशावर आले आहे. या थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे.

पहाटेच्या वेळी तापमानात जास्त घट झाल्यामुळे वेण्णा लेक, लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठले आहेत. गोठलेले दवबिंदू पाहण्यासाठी आणि गुलाबी थंडीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले महाबळेश्वराकडे वळत आहेत. 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहेत. त्यासोबत आता महाबळेश्वरचा पारा घसरू लागल्याने पर्यटकांची गर्दी आणखी वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER