मुंबईत माघी गणपतीनिमित्त ‘सिद्धिविनायक रथयात्रा’

siddhivinayak-rathyatra-of-maghi-ganesh-festival

मुंबई : माघी गणपतीनिमित्त दादर येथून आज मंगळवारी सायंकाळी ‘सिद्धिविनायक रथयात्रा’  प्रारंभ झाली आहे.  दादर-प्रभादेवीच्या मंदिरातून भाविक मंडळी उत्साहात सहभागी झाली असून, भाविकांची गर्दी आणि रथावरील ‘बाप्पा’ची मूर्ती ही रथयात्रेची वैशिष्टे आहेत. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर हेदेखील रथयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला ‘श्री गणेशजयंती’ म्हणून ओळखले जाते. हाच सण ‘माघी गणेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येतो. माघी गणेश जयंतीला ‘तीलकुंद चतुर्थी’ या नावानेही ओळखले जाते.


यानिमित्ताने, सिद्धिविनायक मंदिराला खास सजावट करण्यात आली आहे. त्याचसोबत संपूर्ण परिसरात सुरेख रोषणाईदेखील करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून दरवर्षी लाखोंनी भाविक जमा होतात, हे येथे उल्लेखनीय.