
मुंबई :- हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वीज बिलावरून संताप व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारमधील विसंवादावर बोलताना मंत्रिमंडळातील नेत्यांच्या वक्तव्याची काही उदाहरणं देत फडणवीस म्हणाले, तुम्हाला एकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण वीज बिलाचा प्रश्न मिटवा.
मुख्यमंत्र्यांनी वीज बिलासंदर्भात मौन धारण केलं, एक अक्षरही ते बोलले नाहीत, हा कसला संवाद आहे, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यंत्र्यांवर निशाणा साधला. सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. ज्यांनी वीज वापरली त्यांनी बिल भरायला हवं याबद्दल दुमत नाही; पण ज्यांनी वीज वापरली नाही तर त्यांनी का बिल द्यायचं? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केला आहे.
ही बातमी पण वाचा : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी केली फडणवीसांची पाठराखण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला