पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका ; भाजपलाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस!

Devendra Fadnavis - Maharastra Today
Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्यासाठी सहा सभा घेतल्या. कासेगाव, गाढेगाव आणि पंढरपुरात या सभा झाल्या. प्रत्येक सभेत ते विरोधकांवर बरसले. मात्र, पंढरपुरात सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. थेंब थेंब पावसाने हजेरी लावले. मात्र, पाऊस जोरदार पडला नाही. थेंब थेंब पाऊस पडला. त्यामुळे भाजपलाही पंढरपुरात फडणवीसांच्या सभेत जोरदार पावसाच्या चमत्काराची आस लागली आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली आणि संपूर्ण देशात या सभेची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंढरपुरात भर पावसात सभा घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले.

सभेत रिमझिम पाऊस पडल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून या सभेचे फोटो शेअर केले. भाजप नेत्यांनीही एका शेरसहित हा फोटो शेअर केला. पंढरपूर-मंगळवेढ्यातील उमेदवार समधान आवताडे यांनी फडणवीसांचा हा फोटो शेअर करत अपने संघर्षों की तारीख़ें आबाद रखेंगे, लड़ाई ऐसे लड़ेंगे की विरोधी भी याद रखेंग़े ! हा शेर शेअर केला. माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही हाच फोटो आणि शेर शेअर केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी फडणवीसांचा रिमझिम पावासातील हा फोटो शेअर केला आहे. फडणवीसांच्या सभेतही जोरदार पाऊस पडण्याचा चमत्कार होईल, असं भाजप नेत्यांना वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button