कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्या; देवेंद्र फडणवीसांचे पीयूष गोयलांना पत्र

Devendra Fadnavis-Onion-Piyush Goyal

मुंबई : केंद्र सरकारने कांदा (Onion) निर्यातबंदी लागू केल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे .

या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील कांदा निर्यातबंदी उठावण्यासाठी पीयूष गोयल (Piyush Goyal) यांना पत्र लिहिले आहे. पत्रात देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) कांदा निर्यातबंदी त्वरित उठवावी अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत असून ते दुःखी आहेत.

महाराष्ट्राच्या कांद्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदलादेखील मिळतो. आपण लवकरच उचित निर्णय घ्याल अशी आशा आहे.” असे फडणवीस पत्रात म्हणाले .

दरम्यान यापूर्वीही आपले फोनवरून संभाषण झाले होते. मला आशा आहे की, आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो, असेही ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक; देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER