देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोन मंत्र्यांचा राजीनामा या घडामोडींनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीसंदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आज किंवा परवा भेट घेणार आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबाद येथील गुप्त भेट झाल्याची चर्चा रंगली होती. आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button