पूर्ण लॉकडाऊन केल्यास जनतेचा उद्रेक होईल; फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची  सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. मात्र, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मत व्यक्त केले आहे. पूर्ण लॉकडाऊन (Corona Lockdown) केला तर जनतेचा उद्रेक होईल. निर्बंध असायला हवेत, पण लॉकडाऊन नको… असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रिपोर्ट्स तत्काळ मिळतील यावर उपाययोजना हवी

रिपोर्ट्स तत्काळ कसे मिळतील ही उपाययोजना करायला हवी. रेमडिसीवीर इंजेक्शन कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवावी लागेल, इतर ठिकाण्याहून कसे ऑक्सिजन मिळाले पाहिजे, इंडस्ट्रीचे ऑक्सिजन कमी करावे लागेल, बेड्स मॅनेज करावे लागतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस राहील हे सांगता येत नाही, निर्बंध काही प्रमाणात असले पाहिजे. जनतेचा उद्रेकही लक्षात घेतला पाहिजे. यातून काही मार्ग काढावा लागेल, असेही फडणवीसांनी अधोरेखित केले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘प्रसंग बाका आहे’, फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी, संजय राऊतांचे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button