देवेंद्र फडणवीस यांनी घेतले गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचे दर्शन

devendra-fadanvis-visit-gopinathgad

परळी : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपीनाथगडाला भेट देऊन गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या समाधीचे दर्शन घेतले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस या भागाचा दौरा करत आहेत.

समाधीचे दर्शन घेतल्यानंतर फडणवीस यांनी लोकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणींची माहिती घेतली. उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतील गावांनाही त्यांनी भेट दिली आणि शेतीच्या झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासन फडणवीस यांनी पीडितांना दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER