‘या’ दोन गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या हाती लागल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले

मुंबई :- मनसुख हिरेन (Mansukh Hiren case) मृत्युप्रकरणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एन्काउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर आरोप केले आहेत. संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून सचिन वझे यांनी केला असावा, असा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

सचिन वझे (Sachin Vaze) यांना अद्याप अटक का झाली नाही, यामागे कोण पाठराखण करत आहे? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेली तक्रार फडणवीसांनी वाचून दाखवली. “२६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी माझे पती चौकशीसाठी सचिन वझे यांच्यासोबत गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर १०.३० वाजता आले. दिवसभर सचिन वझेंसोबत होतो, असे त्यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीला सकाळी माझे पती पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत गेले आणि रात्री १०.३० वाजता आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सचिन वझेंसोबत गेले आणि जबाब नोंदवला. जबाबाची प्रत घरी आणून ठेवली. त्यावर सचिन वझे यांची स्वाक्षरीदेखील आहे.” असे तक्रारीत नमूद असल्याची माहिती फडणवीसांनी अधिवेशनात दिली. याचाच अर्थ दुसऱ्या कोणीही त्यांची चौकशी केलेली नाही. तिन्ही दिवस ते सचिन वझेंसोबत होते, असेही फडणवीस म्हणाले. तक्रारीत मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या माहितीनुसार, २ मार्चला मनसुख हिरेन घरी आल्यानंतर वझेंसोबत मुंबईला गेले आणि त्यांच्या सांगण्यावरून वकील गिरी यांच्याकडून पोलीस आणि मीडियामधून फोन येत असल्याची तक्रार करण्यास सांगितले.

माझ्या पतीला पोलिसांनी काही मारहाण केली का? काही त्रास दिला का? यावर पोलिसांनी सांगितले, त्यांना कोणीही मारहाण केली नाही किंवा त्रास दिला नाही. चौकशी झाल्यानंतरही पोलीस वारंवार फोन करत असल्याने तक्रार केल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “२०१७ च्या एका खंडणीप्रकरणात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. एकाचे नाव धनंजय विठ्ठल गावडे आणि सचिन वझे आहे. मनसुख हिरेन यांचे शेवटचे लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे यांच्याकडे होते. ४० किमी दूर मृतदेह सापडतो…गावडेकडे जाण्याचे कारण काय आहे, याच्यापेक्षा अधिक काय पुरावे हवेत? २०१ अंतर्गत सचिन वझेंना तत्काळ अटक का नाही? हा राजकारणचा विषय नाही; पण पुरावे असतानाही २०१ अंतर्गत अटक होत नसेल, तर ३०२ वर सोडून द्या… कोण आणि कशासाठी वाचवत आहे?” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती, तर ती परत कधीच आली नसती. पण दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला. त्यामुळे हे उघडकीस आले आहे. सचिन वझेंना तत्काळ अटक झाली पाहिजे.” अशी मागणी यावेळी फडणवीसांनी केली.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन यांना मारून खाडीत फेकले; फडणवीसांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER