अजित पवार कशाला घाबरत आहेत? फडणवीसांचा उलटप्रश्न

मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरु झाले असतानाही महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेता उलट विरोधकांना अविश्वास ठराव मांडण्याचे आव्हान देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यामागे त्यांचा आमदारांवरील अविश्वास कारणीभूत आहे का? अजित पवार (Ajit Pawar) नेमकं कशाला घाबरत आहेत, असा उलट प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.

ते सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत माध्यमांशी बोलत होते. विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्यास त्यासाठी तात्काळ निवडणूक घेणे हे संविधानाप्रमाणे बंधनकारक आहे. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात पत्र पाठवून राज्य सरकारला आठवण करून दिलेली होती. मात्र, राज्य सरकारमधील नेते ही निवडणूक न घेता विरोधकांनी सभागृहात अविश्वास ठरावा मांडावा, अशी आव्हानात्मक भाषा वापरत आहेत. अजित पवार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास का घाबरत आहेत? आपलेच आमदार आपल्याविरोधात मतदान करतील, असे त्यांना वाटते का? त्यांचा स्वत:च्या आमदांरांवर विश्वास नाही का? त्यामुळे अजित पवार यांच्या या वक्तव्याला अर्थ नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER