पवारांचा सल्ला योग्य, फडणवीसांकडून पवारांच्या मागणीला समर्थन

Devendra Fadnavis-Sharad Pawar

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त कर्ज काढण्याची गरज आहे. त्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल उस्मानाबादच्या पत्रकार परिषदेत दिली होती. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांच्या मागणीच समर्थन केले आहे.

आज उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारची इच्छा शक्ती असली तर शेतकऱ्यांना तात्काळ मदत होऊ शकते. मात्र आघाडी सरकार वेळकाढूपणा करत आहे. वास्तविक पाहता आज राज्य सरकारला शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल एवढे कर्ज मिळू शकते. याची माहिती पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी केलेली मागणी योग्यच असल्याचे फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER