देवेंद्र फडणवीस अचानक शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चेला उधाण

Devendra Fadnavis suddenly visited Sharad Pawar

मुंबई : सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (Maratha and OBC reservation) मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीतील नेते आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. फडणवीसांनी यावेळी शरद पवारांची सदिच्छा भेट घेतल्याचं नमूद केलं आहे. पण या भेटीमागे अनेक कारणं असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारने १५ महिने वाया घालवून ओबीसींचेही आरक्षण घालवले. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मोर्चे काढण्यात मग्न होते, अशी विखारी टीकाही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. फडणवीसांनी अचानकपणे शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button