राहुल गांधी पिकनिकला जातात हे राजदला ठाऊक नव्हतं? – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Rahul Gandhi

पाटणा : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाआघाडीने काँग्रेसवर टीका केली आहे. महाआघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसच्या निकृष्ट कामगिरीमुळे आरजेडी नेते शिवानंद तिवारी (Shivanand Tiwari) यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, बिहारमधील निवडणुकांच्या वेळी राहुल गांधी शिमल्यात बहीण प्रियंकाच्या घरी पिकनिकला गेले होते. दरम्यान, यावर बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मिस्कील टीका केली आहे. “काँग्रेस नेते राहुल गांधी हे पिकनिकला नेहमी जातात. याबाबत राजदला माहिती नव्हतं का? खरंतर राहुल गांधी सिरिअस राजकारणी नाहीतच, ते राजदलाही माहीत आहे. पण आता अपयशाचं खापर राहुल गांधींवर फोडलं जात आहे”, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

जेडीयू नेते नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या १४ नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आज पाटण्यात संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या शपथविधी कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ला प्रतिक्रिया दिली.

बिहार सरकार मंत्रिमंडळाचा पुढे विस्तार होणार आहे. अनेक जण शपथ घेतील. तरुण पिढीला संधी द्यायची ही भाजपची कार्यपद्धत आहे,असं फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा :राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला होते मदत; राजदचा काँग्रेसला टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER