… तर शेतकरी कर्जमाफीला ४०० महिने लागतील : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाबाहेर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, “एक नवा पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. दोन महिन्यांत फक्त १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ४०० महिने लागतील. ” असं गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.

सरकार ठोस पावलं उचलतं नाही तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमचा संघर्ष चालूच राहील. आज संध्याकाळी ६ वाजता आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी फसव्या कर्जमाफीविरोधात पत्रे  लिहिली आहेत. ती पत्रे  राज्यपालांकडे सोपवणार आहोत. शेतकऱ्यांची कशी फसवणूक होतेय, ते राज्यपालांना सांगणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी, महिला सुरक्षेवरून गदारोळ; विधानसभेचे काम स्थगित


Web Title : Devendra fadnavis slams govt on farmer loan waiver issue

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)