अजितदादांच्या पोटातलं ओठावर आले ; वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील वैमानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली .

राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असे अजित पवार यांनी सांगितले . त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. दादांच्या पोटातले ओठावर आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी वैदानिक विकास महामंडळ घोषित करू, असे पवार यांनी स्पष्ट केले .


HW News Marathi

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER