देवेंद्र फडणवीसांनी माझे पत्र नीट वाचावे; शरद पवारांचा पलटवार

Sharad Pawar-Devendra Fadnavis

मुंबई : कृषी कायद्याविरोधात (Farmers Act 2020) शेतकरी नवी दिल्लीत आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. राष्ट्रवादीनेही शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत अनेक आरोप केले होते . यावर पवारांनी स्पष्टीकरण देत निशाण साधला .

फडणवीस माझं पत्र वाचून दाखवत आहेत; पण त्यांनी आधी ते नीट वाचावे, असा सणसणीत टोला पवार (Sharad Pawar) यांनी लगावला आहे. कृषिमंत्री असताना मी ते पत्र लिहिले होते हे खरं आहे; पण माझ्या पत्राचा जे  लोक उल्लेख करीत आहेत, त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असं बोललो आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहेत, त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका पवार यांनी केली. शरद पवार हे नवी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. कृषी कायदा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उद्या बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहेत.

त्याआधी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना २०१० साली लिहिलेल्या पत्राबद्दल खुलासा केला आहे.आम्ही उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ५.३० वाजता भेट घेणार आहोत. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबद्दल मागणी करणार आहोत, असंही पवार यांनी सांगितले. दरम्यान शरद पवार यांनी २०१० मध्ये अनेक पत्रे  लिहून कृषी सुधारणा सुचवल्या होत्या. त्यांच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख आहे. अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी, असं पवार म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची आताची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER