ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचा सोनिया गांधींना टोमणा

devendra fadnavis and sonia gandhi

मुंबई :- काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पाठविलेली पत्र आणि काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य याबाबतची वास्तविक स्थिती स्पष्ट करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोनिया गांधींना पाठवले आहे व ‘ये पब्लिक है, सब जानती है!’ असा टोमणा मारला.

देवेंद्र फडणवीस म्हणतात की, अगदी १३ मे रोजीच्या आकडेवारीचा विचार केला तरी देशातील एकूण कोरोना रूग्णांमध्ये महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण २२ टक्के आहे, हे सतत ३० टक्के किंवा त्याहून अधिक राहिले आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण मृत्यूमध्ये महाराष्ट्राचे प्रमाण ३१ आणि सक्रिय रूग्णांचे सुद्धा प्रमाण १४ टक्के आहे. त्यामुळे महाराष्ट्राची स्थिती दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थिती सुधारली, तर केंद्र सरकारच्या संसाधनांवरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल.

केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली जाते आहे, ज्यात १. ८० कोटी वॅक्सिन्स, ८ लाखांपेक्षा जास्त रेमडेसिवीर, १७५० मॅट्रिक टन ऑक्सिजन, वेंटिलेटर्स, बायपॅप आणि ऑक्सिजन काँन्स्ट्रेटर्सचा समावेश आहे. असे असले तरी काही लोकांना मोदींवर टीका करणे, हे त्यांच्या राजकारणाचे अंतिम लक्ष्य वाटते.

मुंबई आणि राज्यातील मृत्यूची आकडेवारी देऊन फडणवीस यांनी आरोप केला की, राज्याने ९६०३ कोरोना मृत्यू दडवले. गेल्यावर्षीचा हा क्रम याही वर्षी सुरूच आहे. आता यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का, आणि ते देशाने स्वीकारायचे का?

केंद्र सरकारवर टीका करताना काँग्रेसची किंवा काँग्रेसच्या पाठिंब्यांने चालणार्‍या सरकारांना सुद्धा सल्ला देणे हे काम सुद्धा सोनिया गांधींनी केले पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आज संपूर्ण जग मोदींच्या प्रयत्नांकडे विश्वासाने पाहते आहे. त्यामुळे जगातील अनेक देश मदत देण्यासाठी पुढे आले आहेत. भारतीय वॅक्सिन नाकारणारा काँग्रेस पक्ष आज त्यावरच राजकारण करतो आहे, असा टोमणाही फडणवीस यांनी मारला.

Check PDF :- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचा सोनिया गांधींना टोमणा

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button