सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू : देवेंद्र फडणवीस

Mahavikas Aghadi - Devendra Fadnavis

मुंबई : आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली . राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात शनिवारी (२६ सप्टेंबर) मुंब ईतील हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीवरून राजकीय वातावरणात उलट -सुलट चर्चा होत्या . याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे .

त्या मुलाखतीबाबत बोलण्यासाठी ही भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत भाजपची कोणतीही चर्चा नाही. कोणतं कारणंही नाही. सध्या सरकारचं ज्या पद्धतीने काम सुरु आहे त्यामुळे लोकांमध्ये खूप आक्रोश आहे. विरोध पक्ष आम्ही सरकारला जे चुकतंय यावरुन धारेवर धरतोय. मला विश्वास आहे की आपल्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू. आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER