…आणि देवेंद्र फडणवीसांनी गायले अयोध्या आंदोलनावेळेच समूहगान

Devendra Fadnavis

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. भूमिपूजनाच्या निमित्तानं देशभरात आज उत्साहाचं वातावरण होतं. तर दुसरीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांनी आपल्या घरांमध्येही प्रभू श्रीरामाचं पूजन केलं. भूमिपूजनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांनी भजन गायल्याचं पाहायला मिळालं.

राम मंदिराच्या (Ram Mandir) भूमिपूनजनाच्या निमित्तानं देशात उत्साहाचं वातावरण होतं. राम मंदिर भूमीपूजनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या आनंदोत्सवात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार आदी उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयात अयोध्या आंदोलनावेळी गायलं जाणार समूहगान गायलं.

यावेळी फडणवीस म्हणाले की, प्रभू रामचंद्र हे देशाचे आराध्य दैवत आहे. सामान्य माणसातील पौरुषत्व जागे करून असुरी शक्तींचा पराभव करणाऱ्या प्रभू रामचंद्राने आदर्श राज्य कसे करावे हेही दाखवून दिले.अशा प्रभू रामचंद्रांचे मंदिर अयोध्येत व्हावे हे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे.हा क्षण याची देहा याची डोळा अनुभवता आल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भूमिपूजना निमित्त भाजप प्रदेश कार्यालयात भजनाचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूरमधील घरात गुढी उभारत हा सोहळा साजरा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER