ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळता मध्यरात्रीच देवेंद्र फडणवीस यांनी घेतला धाव

काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून राजकीय वाद पाहायला मिळत आहे. आता तर हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या मालकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले ही माहिती कळताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर विलेपार्ले पोलिस ठाण्यात पोहचून त्यांची सुटका करून दिली.

या घटनेवर देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले “महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. आज पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, एवढेच म्हणेन.”

बघा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button