देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री थेट पोलीस स्थानकात धाव , अधिकाऱ्यांवर का भडकले?

Devendra Fadnavis - Maharastra Today
Devendra Fadnavis - Maharastra Today

मुंबई :- राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडतोय.राज्यात सर्वच जिल्ह्यांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग पेटले आहे .

ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (Remdesivir Injection) साठ्या संदर्भात डोकनिया यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात आले . मात्र भाजप नेत्यांनी पोलीस स्थानकात दाखल होत आक्रमक भूमिका घेतली. या सर्व घटनाक्रमानंतर राजेश डोकनिया यांना सोडून देण्यात आले .

पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी 10 पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. आज पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला,’ अशी माहिती माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : केंद्राने घटवले रेमडेसिवरचे भाव , राज्यात ‘तू तू-मै मै’चं राजकारण !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button