महिलेच्या ‘आर्त’ हाकेला, नावाप्रमाणेच शेवटी ‘देवेंद्र’कडून माणुसकीची साद

Devendra Fadnavis

सातारा : मागच्या युती शासन काळात तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गरीब, गरजू लोकांना योग्य मोफत उपचार मिळावे यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून हजारो गरीब आणि गरजू लोकांना त्याचा मोठा फायदा झाला. अनेकांचे प्राणही वाचले. मात्र आताच्या ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray) ही योजना बंद केल्याने गरिबांना वैद्यकीय उपचारासाठी किती हालअपेष्ठा सहन करावा लागत आहे, याचा प्रत्यय नुकताच साताऱ्यात दिसून आला.

साताऱ्या जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकताच विरोधीपक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आमच्या सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना किती प्रभावी आणि लाभदायी ठरली होती याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चार पाच दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील एका महिलेचा मला मॅसेज आला. नवऱ्यावर उपचार झाले, होते नव्हते पैसे संपले. त्यामुळे रुग्णालयाचे बिल थकले. त्यामुळे बरे झालेल्या नवऱ्याला रुग्णालयाने अडवले असल्याचा मॅसेज मला महिलेले केला. लागलीच अतुल भोसले यांना फोन करून महिलेची मदत करण्याची सूचना दिली. जीवनदायी योजनेतून त्यांना मदत पोहचवण्याची सूचना केली. मात्र त्या रुग्णालयात ही योजना लागू नसल्याची माहिती मिळाली. शेवटी भोसले याना स्वतः संपूर्ण बिल भरण्याची सूचना केली. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना गरिबांसाठी किती लाभदायक होती यावरून दिसून येते. मात्र या सरकारने ही योजना का बंद केली? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. राज्य सरकारने याबाबत योग्य विचार करून ही योजना पुन्हा सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, ज्या महिलेच्या मदतीला फडणवीस धावले होते ती महिला आवर्जून फडणवीसांना भेटायला जिल्हाधिकारी कार्यालयात आली होती. आपल्यामुळेच माझ्या नवऱ्याचा जीव वाचला असल्याचे म्हणत मनापासून आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER