
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि भाजप कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांनी आज वीर सावरकर यांच्या १३७ व्य जयंती निमित्त ट्वीटरच्या माध्यमातून अभिवादन केली आहे. तसेच त्यांनी एक जुना व्हिडिओदेखील शेअर केला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपेक्षा सहन केलेल्या देशभक्तांपैकी आहेत. त्यांची ओळख समाजाला कवी, लेखक, जातीभेद दूर सारणारे समाजसेवक म्हणून आहे. देशभक्ती जागृत करून अनेकांना तेज, विचार, प्रेरणा देणार्या स्वातंत्र्यवीरांना आज विनम्र आदरांजली अर्पण करतो असं म्हणतं त्यांनी आज सावरकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान आजच्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पोहचवणं गरजेचे आहे. आणि पुन्हा त्यांच्या विचारांवर देशामध्ये आपल्याला स्फुर्लिंग जागृत करावं लागेल. असा संदेश त्यांनी या व्हिडिओ- ऑडिओ मेसेजमधून दिला आहे.
तेज, विचार, प्रेरणेचा अखंड स्त्रोत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी!#VeerSavarkar pic.twitter.com/U5xzYbAqOY
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला