देवेंद्र फडणवीस 8 व 9 जुलै रोजी नाशिक, जळगाव, औरंगाबाद दौर्‍यावर

Devendra Fadnavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवार दि. 8 आणि गुरूवार दि. 9 जुलै रोजी नाशिक, जळगाव आणि औरंगाबादच्या दौर्‍यावर असणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक कोविड रूग्णालयाला भेट देतील. त्यानंतर कोविड केअर सेंटर, बिटको येथे वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करतील. विभागीय आयुक्तांकडून आढावा घेतील. दुपारी 4.30 वाजता ते मालेगाव येथे एमजीव्ही मेडिकल कॉलेजला भेट देतील. दि. 9 जुलै रोजी जळगावमधील जीएमसी कोविड हॉस्पीटलला भेट देतील. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतील. त्यानंतर औरंगाबादेत जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देऊन जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा घेतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER