सगळेच व्हेंटिलेटर खराब असल्याचे सांगणे म्हणजे राजकारण – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - Maharastra Today

औरंगाबाद :- केंद्र सरकारने (Central Govt.) राज्याला वेळोवेळी रेशन, रेमडीसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर देऊन नेहमी मदत केली पण राज्याने त्याचा योग्य वापर न केल्यामुळे राज्यात कोरोनाच्या केसेसचे व मृत्युचे प्रमाण वाढले आणि राज्याने नेहमीप्रमाणे दोष केंद्राला दिला. संकटाच्या काळात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून राजकारण केलं जात असून, ते योग्य नाही, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज माध्यमांशी बोलताना लगावला.

केंद्राने राज्याला तब्बल ५ हजार व्हेंटिलेटर दिले आहेत, त्यातले काही व्हेंटिलेटर खराब असतील ५ किंवा १० टक्के व्हेंटिलेटर खराब असतील पण सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं हे राजकारण आहे, जे काही व्हेंटिलेटर खराब आहेत दुरुस्त केले पाहिजेत आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 ही बातमी पण वाचा : ‘फडणवीसांनी वस्तुस्थिती मांडताच त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची स्पर्धाच लागते’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button