वाझेंच्या पत्रातील आरोप गंभीर, ‘दूध का दूध, पानी का पानी’ व्हावे : फडणवीसांकडून सीबीआय चौकशीची मागणी

Maharashtra Today

मुंबई :- निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी लिहिलेल्या पत्राने खळबळ उडाली आहे . या पत्रात वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पत्राची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ व्हावे ‘, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. ज्या राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट नाही, तिथून रेमडेसिव्हीर घेता येईल का, ते पाहाण्याची सूचनाही फडणवीसांनी सरकारला केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात दोन कोटी आणि 50 कोटीचा उल्लेख आहे. हा मजकूर विचार करायला लावणारा आहे. महाराष्ट्रात घडतंय ते राज्याच्या आणि पोलिसांच्याही प्रतिमेसाठी चांगलं नाहीत. हायकोर्टाने सीबीआयला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. वाझेंच्या आरोपांचीही सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणांकडून चौकशी करावी. “दूध का दूध पानी का पानी” व्हावं, सत्य बाहेर यावं, अन्यथा पोलिसांची डागाळलेली प्रतिमा कधीच सुधारणार नाही” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले .

आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझे हे मौन कुणी कमजोरी समजू नये, म्हणून मला बोलावे लागते आहे. राजकारण करणे हे नेहमीचे सोपे असते. पण सुशासन आणि आरोग्य सुविधांचे निर्माण ही खरी क्षमतेची परीक्षा असते. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरणाचे नियम कठोरपणे अंमलात येत नाहीत असा घणाघातही पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला आहे.

महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. राज्य सरकारला या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी खूप काही करावे लागेल आणि त्यासाठी संपूर्ण मदत करण्याची केंद्राची तयारी आहे. पण राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू नाहीत तर जगातील सर्वाधिक संसर्ग दरसुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहे असं त्यांनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘मास्टर माइंड हा थक्क करणारा प्रवास’, मनसेचा परबांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button